राजर्षी शाहू महाराजांचे गुण अंगिकारून समाजाने प्रगतीची कास धरावी : माजी मंत्री राजकुमार बडोले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (सडक अर्जुनी) : माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक अर्जुनी येथील जनसंपर्क कार्यालयात लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मीकांतजी धानगाये, माजी पंचायत समिती उपसभापती राजेश कठाने, भाजपा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष युनिसजी पटेल, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शारदाताई बडोले, महिपालजी बडोले, लोकचंदजी कापगते, राजूजी परशुरामकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांचे गुण अंगिकारून समाजाने प्रगतीची कास धरण्याचे आवाहन माजी मंत्केरी राजकुमार बडोले यांनी केले.
News - Gondia