महत्वाच्या बातम्या

 आदिवासी विकास विभागातील संगणक शिक्षक व निर्देशक यांना शासकीय सेवेत समायोजन करा


- शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील कंत्राटी संगणक शिक्षक व निर्देशक यांचे आ. डॉ. देवराव होळी यांना निवेदन 

- आदिवासी विकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करून समस्या सोडवण्याचे आमदारांनी दिले आश्वासन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी, भामरागड  जिल्हा गडचिरोली अंतर्गत २०१९ मध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत कंत्राटी संगणक शिक्षक व निर्देशक पदी नियुक्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन कंत्राटी संगणक शिक्षक व निर्देशक यांच्यावतीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांना देण्यात आले.

यावेळी विनोद मुनघाटे, स्वप्निल राठोड, रजत बारई, एकांत टेकाम, भूषण खोब्रागडे यांचे सह उपस्थित संगणक शिक्षक व निर्देशक यांच्या वतीने आमदार महोदयांना निवेदन देण्यात आले.

शासकीय सेवेसाठी लागणाऱ्या सर्व पात्रता निकष पूर्ण करून  कंत्राटी पदावर नियुक्ती झालेली असून सन २०१९-२० ते शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या ४ वर्षाच्या कालावधीमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नियमित सेवा दिली आहे.

गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात  सातत्यपूर्ण सेवा देत असून आमच्या मागणीचा सहानुभतीपूर्वक विचार करावा अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून आमदार महोदयांना करण्यात आले असता त्यांनी याबाबत आदिवासी विकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे आश्वासन निवेदन कर्त्याना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos