जागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या दिवशीच पर्यटकांना दिसला काळा बिबट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात  व्याघ्र भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या दिवशीच कोळसा वनपरिक्षेत्रात  काळा बिबट दिसून आला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही उन्हाळय़ात काळय़ा बिबट्याने दर्शन दिले होते. त्यानंतर काळय़ा बिबट्याला बघण्यासाठी असंख्य पर्यटकांनी गर्दी केली होती.
 उन्हाळय़ाला सुरुवात होताच हमखास व्याघ्र दर्शन होते. याच काळात पर्यटकांची ताडोबा प्रकल्पात गर्दी होते. देशविदेशातील असंख्य पर्यटक केवळ वाघोबाच्या दर्शनासाठी प्रकल्पात येतात. काल रविवारी ताडोबात नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. मोहुर्ली, ताडोबा व कोळसा या तिन्ही वनपरिक्षेत्रात सकाळ आणि दुपारच्या फेरीत प्रकल्प हाऊसफुल्ल  झाला होता. याचवेळी कोळसा वनपरिक्षेत्रात पर्यटकांची सफारी सुरू असतानाच काळय़ा बिबट्याने दर्शन दिले. जिप्सीतून व्याघ्र भ्रमंती सुरू असताना अचानक हा काळा बिबट पर्यटकांच्या समोर येऊन उभा राहताच सर्वानाच धक्का बसला.     Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-05


Related Photos