चामोर्शी तालुक्यात दारू तस्करांकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / गडचिरोली :
  जिल्ह्यात महाशिवरात्री यात्रेच्या पर्वावर मोठया प्रमाणात अवैधरित्या दारूची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळताच गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांनी आपल्या पथकासह सापळा रचुन दारूतस्कराकडून   ९ लाख  ७ हजार  ४०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना नुकतीच घडली.पिंटु उर्फ प्रशांत मंडल रा.गडचिरोली असे संशयीत आरोपीचे नांव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे हे २७ फेब्रुवारी चामोर्शी पोलिस ठाण्यात हत्या प्रकरणातील गुन्ह्यात  मार्गदर्शन करण्याकरिता हजर असताना खबऱ्याने पिंटु उर्फ प्रशांत मंडल रा.ता. गडचिरोली हा व त्याचे दोन साथिदार हे त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३१ - ए. जी. ८०४४ ने विदेशी दारूची तस्करी करून चामोर्शी हद्दितील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करणार आहे अशी माहिती दिली.त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे आपल्या पोलिस पथकासह तसेच दोन पंचासह  जागगीरीकडे   जाणाऱ्या रस्त्याच्या  बाजुला थांबुन पाळत ठेवुन होते. काही वेळातच जामगिरी मार्गावर क्रिष्णानगर  बासपास  क्रासींगजवळ एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. वाहनास हात दाखवुन थांबविण्याचा इशार केला असता वाहनातील चालक वाहन न थांबविता वाहन समोर दामटले.पोलिस पथकाने या वाहनाचा पाठलाग केला असता वाहन चालकाने थोडया  अंतरावर जावुन थांबविले. त्या वाहनातुन  तिन इसम पळुन जाताना दिसले.पोलिसांनी  त्या इसमांचा पाठलाग केला ते पोलिसांना चकमा देवुन पळुन गेले. 
पोलिसांनी वाहनाच झडती घेतली असता  मागिल सिट  मधल्या सिटवर खाली इंपेरियन ब्लु व्हिस्की कंपनीचे ३९ खर्डा बॉक्स आढळून आले. त्यात ५ लाख ५७ हजार ४०० रूपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी या दारूसह  ३ लाख ५० हजार रूपये किमतीची अवैध दारू वाहतुकिकरीता वापरण्यात आलेली टाटा सुमो  जप्त करण्यात आली.
   या कारवाईत  उपविभागिय पोलिस अधिकारा यांच्या मार्गदर्शनात  पोहवा नजीर पठाण, रघुनाथ जाडे,हिरामन आतला सहभागी झाले होते.गुन्ह्यांचा तपास परिविक्षाधीन पोलिस उपनिरिक्षक दिनेश लिल्हारे हे करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-04


Related Photos