समृध्दीजीवन मल्टीस्टेट कंपनीत अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्या


- गुंतवणूकदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / खांबाडा :
साहेब समृध्द जिवन मल्टिस्टेट लि. या  कंपनीची  योग्य ती चौकशी करून गोरगरीब जनतेचे अडकलेले करोडो रुपये  परत मिळवून द्या अशा आशयाचे निवेदन चंद्रपूर, वरोरा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर येथील गुंतवणूकदारानी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. समृद्ध जि्वन कंपनीने डिसेंबर २०१२ ला विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रात आपले जाळे पसरवले.  बेरोजगार युवक ,युवतींना,महिलांना  कमी वेळात जास्त कमाई चे प्रलोभने देवून एंजट बनविले.  त्या प्रलोभनांना बळी पडून प्रत्येक गावागावात जावून आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांचे कडून पॉलिसी, आरडी काढल्या.  कंपनीकडे करोडो रूपये महिन्यात जमा झाले.  व्यवहार वाढला पण सदर कंपनीने   डिसेंबर २०१५ मध्ये कार्यालये   बंद पाडली.  त्यानंतर शासनाने सदर संस्थेवर सतिश क्षिरसागर यांचि नियुक्ति केली.  पण आजतागायत अडकलेले करोडो रुपये मात्र मिळाले नाही व त्याविषयी योग्य ती माहिती सुध्दा दिली जात नाही . यासाठी गुंतवणूकदारानी याबाबत संबंधित जिल्हाचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिले.  पण याचा उपयोग झाला नाही.  यात अडकलेल्या २० एजंट नी ग्राहकांच्या त्रासामुळे आत्महत्या सुध्दा केल्या.  मात्र याची दखल सुध्दा घेतली नाही.  कित्येकांना मारझोड झाली, काहींना तुंरूगात जाव लागल.  पण न्याय मिळाला नाही, यापुर्वी पावसाळी अधिवेशनात आमदार राहुल मोटे,आशीष शेलार, जयप्रकाश मुधंडा,मेघा कुलकर्णी यांच्या प्रश्नाना उत्तर देताना स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी कंपनीच्या नियमात थोडाफार बदल करून कंपनीची मालमत्ता शोधून ती विक्री करून लवकरात लवकर गुंतवणूकदाराचे पैसे परत देण्याविषयी आश्वासन दिले होते.  ते सुद्धा फोल ठरले.  शेवटी खुद्द कंपनीच्या सर्व एंजट शिष्टमंडळाने २ मार्च रोजी  पैसे परत मिळवून गुंतवणूकदाराना योग्य न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन सादर केले.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-03


Related Photos