धक्कादायक ! लाचेच्या बदल्यात मागितले शरीरसुख , एसीबीने केली अटक


- राज्यातील एसीबीचे पहिलीच कारवाई 
वृत्तसंस्था / ठाणे
:  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या बदल्यात  शरीरसुखाची  मागणी करणाऱ्या भामट्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत.   रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (४८) असे अटक करण्यात आल्याचे नाव असून तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) कर प्रभागात लिपिक म्हणून काम करतो. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) आजवर राज्यभरात पैसे स्वरूपात लाच घेताना अनेक सापळे रचले आणि रंगेहाथ आरोपींना अटक केली. मात्र शरीरसुखाची मागणी करणाऱ्यावर केलेली ही पहिलीच कारवाई आहे. 
३० वर्षीय महिलेने राहत्या घराचे प्रलंबित मालमत्ता कर भरण्यास जप्ती वॉरंट बजावणी पूर्व अखेरची सूचना काढली होती. या नोटीस अनुषंगाने मालमत्ता कर भरण्यास मुदत वाढवून देण्यासाठी व मालमत्ता कराची रक्कम कमी करून देण्यासाठी लाचेच्या स्वरुपात लिपिक राजपूतने तक्रारदार महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. याबाबत तक्रारदार महिलेने एसीबीच्या २६ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची शहनिशा करून आज सुभाष मैदान येथील गार्डनमध्ये तक्रारदार महिलेला भेटण्यासाठी बोलावले असताना सापळा रचून राजपूतला एसीबीने ताब्यात घेतले. ही घटना आज २८ फेब्रुवारी रोजी  घडली.  
 महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी जुलै २०१७ पासून शरीरसुखाची मागणी हाही लाचेचाच प्रकार ठरणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील बदलांमुळे महिलांना संरक्षण मिळणार आहे. महिलांना वाईट हेतूने पाहणं, त्यांना त्यांच्या मर्जीविरुद्ध जास्त वेळ थांबवून ठेवणे, एखाद्या शरीरसुखाची मागणी करणे अशा प्रकारातून शोषण सुरू असते. मात्र त्यांना पाठबळ मिळत नाही. तक्रार केलीच तर उलट दोष दिला जातो. एसीबीच्या कायद्यात 'अनड्यू ॲडव्हांटेज ऑफ एनी थिंग' असा नवा शब्द समाविष्ट केल्याने हा लाचेचाच गुन्हा ठरणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सापळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याला १ ते ३ वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते.    Print


News - Rajy | Posted : 2019-02-28


Related Photos