दहशतवाद्यांच्या तळांवर २१ मिनिटांमध्ये हवाई दलाच्या विमानांनी केली कारवाई


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  भारतीय हवाई दलातील मिराज २००० या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर अवघ्या २१ मिनिटात कारवाई केली आहे.  पाकिस्तानातील   या तळांवर जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. या तळांचा वापर करुन भारतात आणखी आत्मघातकी हल्ला करण्याचा कट असल्यानेच बालाकोट येथे कारवाई केल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी स्पष्ट केले आहे.  
  संरक्षण दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या विमानांनी २१ मिनिटे कारवाई केली आहे. यातील पहिला हवाई हल्ला ३ वाजून ४५ मिनिटांनी झाल्याचे समजते. खैबर पख्तुनवा प्रांतातील बालाकोट येथे पहाटे पावणे चार ते ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत हवाई दलाने बॉम्ब हल्ला केला. बालाकोटमधील जैश- ए- मोहम्मद, लष्कर- ए- तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांच्या संयुक्त प्रशिक्षण तळांवर हा हवाई हल्ला करण्यात आला.  बालाकोटनंतर पहाटे ३. ४८ ते ३. ५५ अशी सात मिनिटे मुझफ्फराबाद येथे कारवाई करण्यात आली. यानंतर चाकोटी येथे पहाटे ३.५८ ते ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत हल्ला करण्यात आला.   Print


News - World | Posted : 2019-02-26


Related Photos