महाऊर्जाच्या भंडारा कार्यालयाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा  :
  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भंडारा येथे झाले.
  भंडारा मेन रोडवर महावितरणच्या विद्युत भवन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे कार्यालय सुरु करणत आले आहे. या कार्यक्रमाला आमदार चरण वाघमारे, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी शांतनु गोयल, महावितरणचे मुख्य अभियंता शेरेकर, अधीक्षक अभियंता कांबळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, म्हाडाचे सभापती तारीक कुरेशी, महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक सारंग महाजन नगराध्यक्ष सुनील मेंढे व अन्य उपस्थित होते. महाऊर्जाच्या या कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून श्री. धाबर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  या कार्यालयामुळे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासाठी शासनाच्या योजना राबविण्यास मदत होणार आहे. सौर ऊर्जेच्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी योजनांची अमबलजावणी गतीने करणे शक्य होणार आहे. सौर ऊर्जेबाबत लोकांमध्ये जनजागृती करता येणार आहे. तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील लोकांना, शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठ़ी करावयाच्या प्रक्रियेसाठी नागपुरात येण्याची आवश्यकता राहणार नाही.  Print


News - Bhandara | Posted : 2019-02-18


Related Photos