महत्वाच्या बातम्या

 रोजंदारी कामगारांना अग्रक्रमाने कामावर घ्या : प्रा. कॉ. दहीवडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / धानोरा : शासकीय आश्रम शाळांमध्ये दिर्घकाळ पासून काम करणाऱ्या रोजंदारी कामगारांची मिटिंग लेखा येथे घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात गजानन दुधबळे म्हणाले दिर्घकाळा पासून आमचे कडून कायम कर्मचाऱ्याचे काम करवून घेतल्या जाते. मात्र कायम कर्मचाऱ्याचे निम्मे वेतन देखिल आम्हांला दिल्या जात नाही. पुढे कामावर घेतील की नाही हा देखिल प्रश्न आमचे पुढे आहे. प्रविण मडावी म्हणाले समान कामास समान वेतन हे तत्व असले तरी त्याचे पालन केल्या जात नाही. एका कायम कर्मचारचा वेतनात चार कर्मचारी कामाला लावले जातात. प्रा. दहीवडे म्हणाले सर्व सोयी सवलती पासून दूर ठेवण्यासाठी आणी अल्प वेतनावर काम करवून घेण्यासाठी ठेका पध्दती जन्माला आली आहे. आणी नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकारचा कल ठेका पद्धतीला प्रोत्साहन देण्याकडे आहे. अल्पअवधीचे काम ठेका पध्दतीने करुन घेतल्या जात होते. खाजगी क्षेत्रात असणारी ठेका पध्दती आता शासकीय क्षेत्रात देखिल ठेका पध्दतीचे आगमन झाले आहे. या अन्यायाचे विरोधात संघटीतरीत्या लढा देण्याकरीता सज्ज झाले पाहीजे. असे प्रा. दहीवडे म्हणाले. मोहनदास दुगा यांचे आभारप्रदर्शनाने मिटींग संपली मिटींगला प्रामुख्याने जिवन हिरासिंग टेकाम, चंद्रकला गणेश नैताम, राधा नरोटे, अजय खोब्रागडे, अनिल उसेंडी, प्रफुल गुरनुले, नेताजी कोलते, अमोल उके, साईनाथ सिडाम, शशिकांत गेडाम, पंकज अलाम, मुकेश मेश्राम, निकेश सहारे, महेश राउत, रोहन उईके, चंद्रकांत भानारकर, सुचिता किरंगे, मंजुषा वरखडे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos