सिरोंचा - अहेरी बसला ट्रकची धडक, एक जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सिरोंचा येथून अहेरीकडे येत असलेल्या बसला विरूध्द दिशेने येत असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
सदर घटना आज १० फेब्रुवारी रोजी रात्री ८  वाजताच्या सुमारास जिमलगट्टापासून सहा किमी अंतरावरील येर्रागड्डा गावाजवळ घडली. बसला धडक दिल्यानंतर ट्रकने झाडाला धडक दिली. अपघातामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एमएच ०६ एस ८८६८ क्रमांकाची बस सिरोंचा येथून अहेरीकडे येत होती. एमएच ३४ बिजी ९९१८ क्रमांकाच्या ट्रकने बसला धडक दिली. 

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-02-10






Related Photos