किष्टापूर येथे अपघातात जखमी झालेल्या इसमासाठी धावले यु.कॉ. मुलचेरा चे तालुकाध्यक्ष शुभम शेंडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा :
  काल ४ फेब्रुवारी रोजी   आल्लापल्ली - गोमनी मार्गावर सायंकाळच्या सुमारास ६ वाजता किष्टापूर नजीक दुचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघात झालेल्या जखमी इसमाला कुणीही रुग्णालयात नेण्यास तयार नसल्याने ही बाब युवक काँग्रेस चे  तालुका अध्यक्ष शुभम शेंडे यांना कळताच  त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या जखमी इसमास स्वखर्चाने रुग्णालयात हलविले. 
अपघातग्रस्ताची  प्रकृती चिंताजनक असल्याचे निर्दशनास आले. यामुळे शुभम शेंडे यांनी स्वखर्चातून चारचाकी वाहनाला पाचारण केले. जखमीला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अनिल दशरथ तलांडे  (२१)  रा. कनेपल्ली  ता. अहेरी असे जखमीचे नाव  आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर जखमी इसमाच्या प्रकृती  मध्ये सुधारणा झाली. हा अपघात रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे झाला आहे. ईश्वर सेवा हीच जनसेवा असा संदेश शुभम शेंडे यांनी दिला आहे .  अपघातात जखमी असलेल्या रुग्णाला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याकरिता यु.कॉ.तालुका अध्यक्ष शुभम शेंडे व त्यांचे मित्र सिध्दार्थ दुर्गे,मनीष कडते यांनी पुढाकार घेतला.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-05


Related Photos