महत्वाच्या बातम्या

 भंडारा व तुमसर येथे पुण्यश्लेक अहिल्याबाई होळकर स्त्री-शक्ती समाधान शिबीर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपिठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकिय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणुन पुण्यश्लेक अहिल्याबाई होळकर स्त्री-शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २२ मे २०२३ रोजी बचत भवन, तहसील कार्यालय भंडारा येथे करण्यात आले.

तालुक्यातील पिडीत व समस्याग्रस्त महिलांचे ९ लेखी तक्रार अर्ज प्राप्त झाले असून संबंधीत विभागाकडे अर्ज वर्ग करून त्याचे निराकरण करण्यात येईल. काही अर्ज ऑनलाईन पध्दतीने महिलांनी केलेले आहेत. शिबीरात उपस्थित महिलांनी केलेल्या संबंधीत प्रश्नांची उत्तरे देऊन महिलांचे समाधान करण्यात आले. सदर शिबीरामध्ये विविध विभागांनी स्टॉल लावून त्यांचेकडील योजनांची माहिती दिली. शिबीराचे अध्यक्षस्थानी असलेले सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गवारे यांनी शिबीराचे उदघाटन केले. त्यावेळी तहसिलदार अरविंद हिंगे, संघमित्रा कोल्हे, बी. डि. ओ,  जि.म.बा.वि.अधिकारी तुषार पौनिकर, बा.वि.प्र. अधिकारी, ग्रामीण राहुल निपसे, सभापती प. समिती रत्नमाला चेटुले, सभापती महिला व बाल विकास विभाग जि.प. स्वाती वाघाये तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

तसेच आज तहसील कार्यालय तुमसर येथे पुण्यश्लेक अहिल्याबाई होळकर स्त्री-शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील पिडीत व समस्याग्रस्त उपस्थित महिलांनी केलेल्या संबंधीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन महिलांना समस्येतुन मुक्त करणेबाबतआश्वासन देण्यात आले. सदर शिबीरास उपविभागीय अधिकारी बी वैष्णवी यांनी शिबीराचे उदघाटन केले. यावेळी तहसिलदार.पेंदाम, बा. वि प्र. अधिकारी योगीता परसमोडे व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos