अर्थसंकल्प २०१९ : बँका-पोस्टातील ठेवीच्या व्याजावरील करकपातीची मर्यादा ४० हजार रुपयांवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करताना मध्यमवर्ग तसेच वरिष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. बॅँका तसेच पोस्ट ऑफिसेसमधील ठेवींवरील व्याजावरील करकपातीची मर्यादा १० हजार रूपयांवरून ४० हजार रुपयांवर नेत असल्याची घोषणा केली आहे.
 या निर्णयामुळे बॅँका तसेच पोस्टामधील ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार असून, बॅँकांना १५ जी/एच फॉर्म भरून घेण्याचा त्रासही कमी होणार आहे. सध्या बॅँकांमधील ठेवींवरील व्याज वर्षाला १० हजार रुपयांपेक्षा अधिक झाल्यास त्यावर उद्गमी करकपात केली जात होती. ज्या ठेवीदारांचे उत्पन्न करपात्र नाही, अशांना दरवर्षी बॅँकेला १५ जी/एच हा फॉर्म भरून द्यावा लागत होता. आत ही मर्यादा ४० हजार रुपयांवर नेली गेल्यामुळे ठेवींचे प्रमाण वाढून बॅँकांना दिलासा मिळण्याची मोठी शक्यता आहे.  Print


News - World | Posted : 2019-02-01


Related Photos