महत्वाच्या बातम्या

 महा जनसंपर्क अभियानातून मोदींचे कार्य घराघरात पोहोचवा : आमदार डॉ. देवराव होळी


- भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

- ३० मे ते ३० जून भाजपाचे महा जनसंपर्क अभियान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ९ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्य ३० मे ते ३० जून महा जनसंपर्क अभियानाचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत असून या कार्यकाळामध्ये मोदीचे कार्य त्यांच्या कामांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर खासदार अशोक नेते, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, महामंत्री प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, जेष्ठ नेते रमेश भुरसे, प्रकाश गेडाम, महीला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष योगिता पिपरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संदीप कोरेत, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, प्रणय खुणे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदारनी बूथ सशक्तिकरणाची आवश्यकता असून त्यातील राहिलेले कार्य या आठवड्यामध्ये पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos