महत्वाच्या बातम्या

  अरसोड्यात जुगार अड्ड्यावर छापा : सहा जण जेरबंद


- आरमोरी पोलिसांची ३ सप्टेंबरला कारवाई; २,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील अरसोडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आरमोरी पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई ३ सप्टेंबर रोजी करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अरसोडा परिसरातील अवैध जुगाराच्या प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कारवाई झाल्याचे मानले जात आहे. अरसोडा परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेले विजय दोनाडकर, सचिन मैद, अशोक मैद, तीर्थराज कुथे, आशीर्वाद ढोरे आणि कृष्णा सिलार हे सहा जण पोलिसांच्या ताब्यात सापडले.

छाप्यादरम्यान पोलिसांनी २,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगाराच्या ठिकाणी आढळलेल्या साहित्याची तसेच जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.

उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून गुन्हा -
या कारवाईनंतर पोलिस उपनिरीक्षक विक्रांत तळोले यांच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलिस ठाण्यात सहाही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील अवैध जुगाराच्या प्रकारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही कारवाई अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos