महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१८ मे महत्वाच्या घटना

१८०४ : नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.

१९१२ : पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.

१९३८ : प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.

१९४० : प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.

१९७२ : दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

१९७४ : भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.

१९९० : फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.

१९९१ : रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.

१९९५ : स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.

१९९८ : पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.

२००९ : श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.

१८ मे जन्म

१०४८ : पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)

१६८२ : छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)

१८७२ : ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)

१९१३ : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९९८)

१९२० : पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००५)

१९३३ : भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.

१९७९ : माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.

१८ मे मृत्यू

१८०८ : बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.

१८४६ : मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)

१९६६ : वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)

१९९७ : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९०१)

१९९९ : पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.

२००९ : एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)

२०१२ : भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.

२०१७ : भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)





  Print






News - todayspecialdays




Related Photos