महत्वाच्या बातम्या

 मागेल त्याला गुरांचा गोठा योजनेचा लाभ द्यावा : खासदार सुनील मेंढे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) सभा आज खासदार सुनिल मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथील जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक बोंद्रे, समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

खासदार सुनिल मेंढे म्हणाले की, जिल्ह्यात दुध संकलन वाढवायचे असल्याने मागेल त्याला गुरांचा गोठा/शेड/ कुकुट पालन शेड लाभार्थ्यांना द्यावे. जल जिवन मिशन हे केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना असून सन 2024 पर्यंत कोणतेही घर नळापासून वंचित राहू नये, त्यानुसार विभागाने कार्यवाही करावी. तसेच ज्या जुन्या नळ योजना हस्तांतरित झाल्या याबाबत सविस्तर माहिती सादर करावी. घरकुलांच्या लाभार्थ्यांना वेळेवर योजनेचा लाभ घ्यावा. आदिवासी लाभार्थ्यांचे वीज कनेक्शन प्रलंबीत ठेवू नये. कषि विभागानी त्यांच्याकडील असलेल्या विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा. तसेच प्रगतशील शेतकरी यांच्या शेताला भेट द्यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण भागातील मणुष्य बळाला काम उपलब्ध करून देण्यात येते. जिल्ह्यासाठी मंजूर निधीच्या दुप्पट कामे करून घेतायेतात तरी सर्व खंड विकास अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष घालावे. ज्या गावांची मोजणी झाली नाही त्या गावांची ड्रोणद्वारे सर्वेक्षण करून तात्काळ मोजणी करावी, असे निर्देश यावेळी खासदार मेंढे यांनी संबंधीत विभागांना दिले.

नरेगाच्या कामाची मागणी आल्या बरोबर नरेगाची कामे लवकर सुरू होतील याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कृषि विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबागांच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच विविध विभागांनी त्यांच्याकडे असलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी सर्व विभागांना दिले.

दिशा समितीच्या आजच्या बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तावर कार्यवाही, (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भूमी अभिलेख व्यवस्थापन कार्यक्रम, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना आदी योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीचे संचालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक बोंद्रे यांनी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos