बल्लारपूर तालुक्यातील मानोरा गावाच्या हद्दीत बिबट्याचा हैदोस, बकरीला केले ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
तालुक्यातील जंगल परिसराला लागून असलेल्या मानोरा गावात काल २१ जानेवारी रोजीच्या पहाटे रावजी पांडूरंग गव्हारे यांच्या गोठ्यातील बकरीला बिबट्याने ठार केले. तसेच काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याने हैदोस माजविला आहे. यामुळे या परिसरात बिट्याची दहशत निर्माण झाली आहे.
गव्हारे यांच्या गोठ्यातील जनावरे पहाटेच्या सुमारास आरडा ओरड करू लागले. यामुळे नागरीकांनी गोठ्याकडे धाव घेतली. नागरीकांच्या आवाजाने बिबट्याने पळ काढला. यावेळी गोठ्यातील एका बकरी कमी आढळून आली. बकरीचा शोध घेतला असता गावाशेजारील तलावाजवळ मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती ग्रामस्थानी वनपरीक्षेत्र अधिकारी जी. आर. इंगळे यांना तसेच वनरक्षक प्रविण विरूटकर यांना दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून मोक्का पंचनामा केला. नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-22


Related Photos