महत्वाच्या बातम्या

 मतदानाच्या आणि आदल्या दिवशी मंजुरीशिवाय वृत्तपत्रात जाहिरात नको : निवडणूक आयोगाच्या सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य काेणत्याही संस्थेने मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीच्या (एमसीएमसी) मंजुरीशिवाय मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी (सायलेन्स पिरियड) कोणतीही जाहिरात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाने रविवारी म्हटले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका १० मे रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

नियमांचे काटेकोर पालन करा

निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, मतदानाचा दिवस व त्याच्या आदल्या दिवशी राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य काेणत्याही संस्थेने जिल्हा किंवा राज्यस्तरावर एमसीएमसीच्या मंजुरीशिवाय जाहिराती प्रसिद्ध करू नयेत. सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos