महत्वाच्या बातम्या

 नागपूर : नि:शुल्क मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : बेरोजगार उमेदवारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथे ८ मे रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू बेरोजगार उमेदवारांना प्रवेश नि:शुल्क आहे.

बेरोजगार उमेदवारांना व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीची तयारी, दहावी, बारावीनंतर उपलब्ध असणारे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, अल्पमुदतीचे रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण याशिवाय शासकीय कर्ज योजना व शिष्यवृत्ती आदी सर्व विषयावर तज्ज्ञ व्यक्ती व महामंडळामार्फत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहेत.

बेरोजगार उमेदवारांनी समुपदेशन केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर) यांचेद्वारे करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos