महत्वाच्या बातम्या

 मन की बात कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांचे आवाहन


- रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी 11 वाजता  


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आज 29 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोली ची महत्त्वपूर्ण बैठक महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सर्व महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी, महामंत्री सचिव, उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष, महामंत्री या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व वार्डात व प्रत्येक बुथ वर व शक्ती केंद्रांवर 100 व्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करून वार्डातील नागरिकांना बोलवावे व त्यांना कार्यक्रमात सहभागी करावे तसेच जिल्ह्यातील व शहरातील जास्तीत जास्त नागरिक, महिला व युवक- युवतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या 100 व्या मन की बात कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रतिपादन यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांनी केले.
यावेळी बैठकीला जिप च्या माजी सभापती रंजीता कोडाप भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, कोषाध्यक्ष अल्का पोहनकर, माजी शहराध्यक्ष पल्लवी बारापात्रे, माजी नगरसेविका लता लाटकर, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, ज्योती बागडे उपस्थित होते.
देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांचा रविवार ३० एप्रिल,२०२३ रोजी सकाळी 11 वाजता  १०० वा मन कि बात कार्यक्रम आहे. ही मन कि बात प्रत्येक शक्ती केंद्रावर व मंडळावर किमान 30 ते 50 जणांच्या ऊपस्थितीत ऐकायची व बघायची आहे. व त्यांचे सर्व फोटो कृपया तातडीने विदर्भ कार्यालयात मो.क्र. 8263003715 किंवा 9405940832/ 9422153833 या मोबाईल नंबर वर Whats App करावे असे आवाहन महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos