हळदा येथे वाघाने घेतला गुराख्याचा बळी


- हळदा - आवळगाव परिसरात वाघाची दहशत कायम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ब्रम्हपुरी :
तालुक्यातील हळदा - आवळगाव परिसरात वाघाची दहशत कायम असून आज १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ११.३०   वाजताच्या दरम्यान गायी चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला आहे. 
दिवाकर गेडाम (वय अंदाजे ४५) रा. हळदा असे मृतक गुराख्याचे नाव आहे. गायी चारण्यासाठी दिवाकर गेडाम हा गावालगतच्या जंगलात गेला होता. गावापासून केवळ अर्धा किमी अंतरावर वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये दिवाकर गेडाम जागीच ठार झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या परिसरात वाघाने दहशत माजविली आहे. १८ नोव्हेंबर रोजी पवनपार येथील एका महिलेचा गावालगतच वाघाने बळी घेतला होता. यानंतर २५ नोव्हेंबर रोजी आवळगाव येथे एका मुलीचा बळी घेतला होता. तसेच एका बालकाचा सुध्दा वाघाने बळी घेतला. अशा अनेक जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून नागरीक आक्रमक भूमिका घेत आहेत. अनेकदा वनविभागावर नागरीकांनी रोष व्यक्त केला आहे. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-12


Related Photos