महत्वाच्या बातम्या

 रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये माेठी वाढ : महाराष्ट्रात ५ हजार २७० जणांना संपवले जीवन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत तामिळनाडू, महाराष्ट्र आघाडीवर आहेत.देशात २०२१ मध्ये ४१ हजार ६७२ आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी तामिळनाडूत ७ हजार ६७३ व महाराष्ट्रात ५ हजार २७० आत्महत्या झाल्या.

यातील अधिक चिंताजनक बाब म्हणजे तामिळनाडू व महाराष्ट्रात २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत या आत्महत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०१७ मध्ये तामिळनाडूत ५ हजार ६२४ व महाराष्ट्रात ३ हजार ६६९ आत्महत्या झाल्या. आत्महत्या करणारांची संख्या वाढत राहिली आहे.

हाच कल भाजपशासित मध्य प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांत पाच वर्षे चिंतेचा राहिला. २०१७ मध्ये मध्य प्रदेशात ३०३९ व गुजरातेत २ हजार १३१ आत्महत्या झाल्या. २०२१ मध्ये मध्य प्रदेशात ४ हजार ६५७ व गुजरातेत ३ हजार २०६ आत्महत्या झाल्या. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांमध्येही चित्र फारसे चांगले नव्हते. रोजंदारी कामगारांच्या २०२१ मध्ये आंध्रात ३ हजार १४ तर तेलंगणात ४ हजार २२३ आत्महत्या झाल्या. प. बंगालमध्ये पाच वर्षांत रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली. राज्यात २०१७ मध्ये १ हजार ४३८ तर २०२१ मध्ये ९२५ आत्महत्या झाल्या.

- नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमध्ये २०२१ मध्ये २९ आत्महत्या झाल्या. माकपाशासित केरळमध्ये २०१७ मध्ये २ हजार ६४३ आत्महत्या झाल्या होत्या. २०२१ मध्ये हीच संख्या २३१३ एवढी होती.

- रोजंदारी कामगारांच्या आत्महत्या देशात वर्षानुवर्षे वाढतच असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालय चिंतेत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos