रेडलाईट परिसरातील तरुणीवर चाकूहल्ला : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील रेडलाईट परिसरात एका तरुणीवर चाकूने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना २६ मेच्या रात्री घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणीच्या खोलीत एक युवक आला होता. त्याने ऑनलाइन पेमेंट करून खोलीत प्रवेश केला. काही वेळानंतर तो बाहेर गेला आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या युवकाला खोलीत पाठविले. त्यानंतर त्या युवकाने चाकू काढून तरुणीला धमकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
चाकूचा वार टाळण्यासाठी तरुणीने हात पुढे केल्याने तिच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्या डोक्यावर व कंबरेवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध पडली. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या परिचित महिलेला सांगितला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुजल सिद्धार्थ बोरकर आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोषकुमार कनकम करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




