पुरामध्ये सर्वस्व गमावलेल्या महिलेस जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
पुरामुळे घर कोसळले, कपडे, अन्नधान्य, रोख रक्कम तसेच अन्य साहित्यसुध्दा वाहून गेले. यामुळे संकट कोसळलेल्या महिलेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे.
तालुक्यातील लिंगमपल्ली येथील निर्मला पोट्टी सडमेक या महिलेचे घर अतिवृष्टीमुळे वाहून गेले. यामुळे तिच्यावर संकट कोसळले. सदर महिला विधवा आहे. मुलासोबत लिंगमपल्ली येथे राहत होती. अतिवृष्टीमुळे तिचे राहते घर १५  आॅगस्ट रोजी वाहून गेले. यामध्ये दोन शेळ्या, नगदी २४ हजार रूपये, १ तोळे सोने, चांदीचे दागीणे तसेच कोंबड्या वाहून गेल्या. यामुळे निर्मला सडमेक हिचा संसार उघड्यावर आला. या बाबीची दखल घेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वतःकडून आर्थिक मदत केली. तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती सुनिता कुसनाके उपस्थित होत्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-22


Related Photos