महत्वाच्या बातम्या

 महाराजस्व अभियान अंतर्गत प्रशासन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावे : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम


- पेरमिली येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते शासकीय योजनेचा जत्रा उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने बंद पडलेले अभियान पुन्हा सुरु.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना दुर्गम भागातील नागरीकांपर्यंत पोहोचत नसतात आणि पोहोचल्याच तरी लोकांना वारंवार तालुका मुख्यालय जावे लागते म्हणुन नागरीक अनेक योजनेचा लाभापासुन वंचितच असायचे. कोणत्याही योजनांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करणे हे गरीब निरक्षर जनतेसाठी अशक्यप्राय व्हायचे त्यावर ऊपाय म्हणुन महाराजस्व अभियानामार्फत शासनालाच जनतेच्या दारी पोहोचविण्याची योजना होती परंतु दुर्दैवाने बर्‍याच कालावधी पासुन ही योजना बंद होती. 

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी राज्याचे ऊपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेन्द्र फडणवीसांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली आणि या भागासाठी हे अभियान फार गरजेचे असल्याचे लक्षात आणुन दिले, तातडीने हे अभियान सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे केली, देवेन्द्र फडणविस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन हे अभियान पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि तशा सूचना तातडीने जिल्हाधिकारी यांना दिले. अहेरी ऊपविभागात महाराजस्व अभियान सुरु होणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय मिना यांनी राजे साहेबांना कळवले. १७ एप्रिल २०२३ ला अहेरी तालुका प्रशासनामार्फत  पेरमिली येथे झालेल्या कार्यक्रमात राजे साहेबांना उद्घाटन करण्यासाठी पाचारण करण्यात आले.

ऊघ्दाटक म्हणून बोलतांना राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, प्रशासनाला दुर्गम भागात पोहोचुन प्रत्येक योजनेची माहिती सामान्य जनतेला देऊन शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाला केले. 

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अंकीत, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सरपंच किरण नैताम आणि इतर अनेक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पेरमिली परिसरातील लोकांची मोठ्या संख्येने ऊपस्थिती होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos