महत्वाच्या बातम्या

 कोटरा येथे शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत विविध दाखल्यांचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : तहसील कार्यालय कोरची राजस्व अभियानांतर्गत अनुदानित माँसाहेब माध्यमिक आश्रमशाळा कोटरा येथे शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत विविध दाखल्यांचे वितरण लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते १२ एप्रिल बुधवारला वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरचीचे नायब तहसीलदार अनंत बोदेले, उद्घाटक म्हणून मुरकुटीचे उपसरपंच राजारामजी नैताम तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी मंडळ अधिकारी लाकेश कटरे, कृषी पर्यवेक्षक आर एन पंचभाई, यु आर सयाम, आरोग्य विभागाचे लोनबले साहेब, आश्रम शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक सुनील अवसरे, प्राथमिक मुख्याध्यापक यशवंत दरवडे, कोटराचे उपसरपंच देवचनद दखणे, माजी सरपंच तुलाराम मडावी, पोलिस पाटील लीनाताई तांडेकर, धरमदास कोवाची, तमुस अध्यक्ष राजू दुग्गा, व खुर्शीपारचे पोलिस पाटील घाशीराम हारामी, मर्केकसाचे सरपंच सुरेश उईके, सहकारी संस्था कोरचीचे सहायक निबंधक डी. ए. शिरगावे, आश्रम शाळेचे जेष्ठ शिक्षक रमेश नान्ने, विलास गावंडे, अधिक्षक मुकेश हरडे, धुरपाल नैताम, पंचायत समिती कोरचीचे व मुलकलवार, ग्रामीण रुग्णालय कोरची निशा साखरकर, सेन्ट्रल मनेजर मनिवाईज सचिन देशमुख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर 7/12 वाटप १८३, रहिवासी दाखले ४२, उत्पन्न दाखले २३, होमसाईल १२, जात प्रमाणपत्र २९ व इतर दाखल्यांचे वितरण कोरची तालुक्यातील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाथ तलाठी कोरची यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मंडळ अधिकारी पी एम धाईत यांनी केले. कार्यक्रमाला परीसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारयानी सहकार्य केले. यावेळी आश्रम शाळेच्या मुलींनी विविध प्रकारचे नृत्य सादर केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos