महत्वाच्या बातम्या

 जीवनशैली बदलवून आरोग्याची काळजी घ्या : खासदार बाळू धानोरकर


- उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आरोग्य दिन साजरा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : तीन - चार दशकापूर्वी योग्य आहार व नियमित व्यायाम असायचा. परंतु आता धावपळीच्या जगात आपली जीवनशैली बदलली आहे. यावेळी जेवण व व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या अनेक व्याधी आपल्याला होत आहेत. त्यामुळे आता जुनी जीवनशैली आत्मसात करून सकस आहार व व्यायाम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 

आज वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक एम. बी. चिंचोले यांनी महाराष्ट्र शासनाच्या सुंदर माझा दवाखाना या मोहिमे बाबत माहिती दिली. तर प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. किन्नाके  आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर पुढे बोलताना म्हणाले कि, कोरोनाच्या आपत्तीमध्ये अनेक जवळचे व्यक्ती आपण गमावले आहेत. या काळात आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी कोरोना योद्धे म्हणून काम केले. त्यांच्या कामामुळेच या काळात अनेक जीव वाचविता आले. त्यामुळे आता आपण आपली काळजी घेणे गरजेचे असून आपल्या जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशकगोविंद कुंभारे तर आभार प्रदर्शन येडे यांनी केले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos