महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर व्यापारी मंडळातर्फे बैल पोळ्यानिमित्त शेतकरी बांधवांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बैल पोळा पर्वानिमित्त बल्लारपूर व्यापारी मंडळाच्या वतीने शेतकरी बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना पोळा पर्वाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाला बल्लारपूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राकेश सोमानी, कार्याध्यक्ष इब्राहिम जवेरी, सचिव प्रशांत मांढरे, कोषाध्यक्ष सुरेंद्र काबरा, संघटनमंत्री ज्ञानेंद्र आर्या, उपाध्यक्ष सोमेश खंडेलवाल, सहसचिव गुणवंत जीवतोडे, प्रसिद्धीप्रमुख रमेश लालवानी यांच्यासह ज्येष्ठ व्यापारी सुरेश मालू, जगदीश काबरा, रामनरेश सोमानी, राजू मुंदडा, सुनील मुथा, जय तिलोकानी, गौरव अट्टल, मयूर सांखला आणि राज भारद्वाज उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक सुमित उर्फ गोलू डोहने, नगरसेवक प्रणित सातपुते, नंदकिशोर सातपुते, रघुवीर सोमानी, शाहिद शेख, मीक्की शर्मा, चिंटू भोंगले, सुधाकर पारधी, मास्टर श्लोक सोमानी यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

बैल पोळा हा शेतकरी आणि पशुधन यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करणारा महत्त्वाचा सण आहे. शेतीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा या पर्वातून जपली जाते. या निमित्ताने व्यापारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरवासीयांना पोळा पर्वाच्या शुभेच्छा देत सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित नागरिक, व्यापारी आणि मान्यवरांचे आभार मानण्यात आले.





  Print






Related Photos