आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठे कार्य केले.
लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत.
News - Rajy | Posted : 2021-08-10