यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात ८ जण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ
: जिल्ह्यातील  कळंब येथे चापर्डाजवळ झालेल्या भीषण अपघातात ८ जण ठार झाले आहेत. या अपघातात ७ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल २४ डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कळंब रोडवर चापर्डाजवळ ट्रक आणि क्रूझरची समोरा समोर धडक झाल्याने ८ प्रवासी जागीच ठार झाले. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात क्रुझरचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला . दरम्यान, अपघातातील सातही जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच अपघाताचं नेमकं कारण समजू शकले नाही.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-25


Related Photos