महत्वाच्या बातम्या

 महिलेकडे बघितले म्हणून ट्रॅक्टरला बांधून कामगाराला बेदम मारहाण


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : कामावर असताना कामगाराने महिलेकडे बघितल्याच्या कारणावरून तरुणाला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना उघळकीस आली आहे. सदर घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव येथे घडली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

माहितीनुसार राहुल जगदाडे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून तो बीड जिल्हातील रहिवासी आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कामासाठी मजूर म्हणून तो ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव येथे आला होता. या तरुणाने गावातील एका महिलेला बघितले, असा आरोप करत त्याला ट्रॅक्टरला बांधले. कोयता दाखविला, मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सदर प्रकरणी मारहाण करणारे आरोपी दिनेश अवसरे, गणेश अवसरे, निलेश अवसरे या तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos