महत्वाच्या बातम्या

 नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा व्यवस्था सुधारण्याच्या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. आम आदमी पार्टीच्या सतत प्रयत्नातून नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा सुधारण्यासाठी पुढाकार घेत आहेत. परंतु शाळांच्या सुधारणे सोबतच आम आदमी पक्षाकडून नगर परिषदेचा शाळेत हस्तांतरणास सातत्याने विरोध होत असून, नगर परिषद शाळेतून स्थलांतरित करण्याबाबत पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व मुख्याधिकाऱ्यांकडे येत्या दोन महिन्यात लेखी आश्वासन देण्याची मागणी करण्यात आली.   

यावेळी शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार , जिल्हा संघटक भिवराज सोनी व प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सचिव ज्योतीताई बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ हुसैन शेख, युथ अध्यक्ष सागर कांबळे, सचिव रोहित जंगमवार, संघटक अलिना शेख, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, संघटक किरण खन्ना, CYSS प्रमुख शिरीन सिद्दीकी, सहप्रमुख आशिष गेड़ाम, बेबी बुरडकर, सुधाकर गेडाम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos