महत्वाच्या बातम्या

 पुणेकर ऑनलाइन सेवा घेण्यात अव्वल : वर्षभरात ३४ लाख नागरिकांनी घेतला लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : जनतेला ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा पोर्टल सुरू झाले आणि दाखले घेण्यासाठी सरकारी कार्यालयात मारावे लागणारे खेटे कमी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यातही या सेवेचा सर्वाधिक उपयोग पुणेकरांनी घेतला आहे. गतवर्षी ३४ लाख पुणेकरांनी या ऑनलाइन सेवेचा लाभ घेतला आहे.

सरकारच्यावतीने आपले सरकार या संकेतस्थळावर व मोबाइल ॲपवर ५०६ अधिसूचित सेवांपैकी ४०९ सेवा ऑनलाइन केल्या आहेत. उर्वरित ९७ सेवांसाठीची प्रणाली विकसित होत आहे. राज्यातील ३२ हजार ५४३ आपले सरकार सेवा केंद्रांचा उपयोग यासाठी होत आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत ९ कोटी ७८ लाख ८१ हजार ८१२ अर्ज प्राप्त झाले असून, ९ कोटी ४० लाख ६५ हजार ७३२ अर्जांवर कार्यवाही झाली आहे. आपले सरकार वर सेवा प्राप्त करण्यासाठी अगोदर स्वतःचे प्रोफाइल तयार करावे लागते. त्यात सर्व अधिकृत कागदपत्रांचा समावेश असतो. ३१ मार्च २०२१ पर्यंत ४२ लाख ७० हजार ९७ जणांनी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करून प्रोफाइल तयार केले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos