पुलखल गावशिवारातील शेतात बिबट मृतावस्थेत आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  चंद्रपूर मार्गावरील  पुलखल गावशिवारातील शेतात एक बिबट मृतावस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सदर बिबट्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे विषबाधेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके ,  वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही.कैैलुके, सर्पमित्र अजय कुकडकर, वनरक्षक कवडो, राठोड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  ४ ते ५ दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्यामुळे मृतदेह खराब होण्याच्या मार्गावर होता. हा बिबट ३ ते ४ वर्षे वयाचा असून अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. शिवाय विद्युत शॉकमुळे मृत्यू झाल्याच्या खुणाही आढळल्या नाही. त्यामुळे शवपरिक्षणाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही.कैैलुके यांनी सांगितले.  ज्या ठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळला त्या परिसरात एक पोल्ट्री फार्म आहे. विशेष म्हणजे बिबट्याच्या पोटात कोंबडीचा अंशही आढळला. त्यामुळे सदर बिबट्याने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या खल्ल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  बिबट्याच्या मृतदेहाचे नमुने हैैदराबाद येथील प्रयोगशाळेत  पाठविण्यात आले आहेत. अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यृचे कारण कळू शकेल.  पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही.कैैलुके करीत आहेत. 

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2018-12-22






Related Photos