महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुर शहरात जय श्रीरामाचा गजर


- रामनवमी जन्मोत्सवनिमित्त काढली शोभायात्रा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपुर : भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सवानिमित्त बल्लारपुर शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.  यावेळी शहर जय श्री राम नामाच्या गजरात रंगले होते. त्यामुळे शहरातील वातावण भक्तीमय झाले होते. या शोभायात्रेत शहरातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी भक्तांमधील उत्साह पाहण्या सारखा होता.

बल्लारपुर शहरात मोठ्या प्रमाणात शोभा यात्रा काढण्यात आल्या होत्या. याप्रसंगी चोहीकडून रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी या तालावर, ढोल ताशांचा गजर ऐकावयाला मिळाला. एक ही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम या गाण्यवर लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वच थिरकतांना दिसले. 

यानिमित्याने शहरातील मुख्य मार्ग व कॉलरी मार्गवर राम भजनाचे भोंगे,  तोरण व पताके लावण्यात आले होते. शहरवासी भक्तीमय वातावरणात दंगून जल्लोषात रामजन्मोत्सव साजरा करताना दिसले. शहरात दंडाबाबा कॉलरी परिसर, साईबाबा मंदिर, राम मंदिर पेपर मिल परिसरातून  शोभायात्रा काढण्यात आले.

श्रीरामनवमीनिमित्त श्री रामचंद्र सेवा समिति बल्लारपुर सह साई बाबा मंदिर, बजरंग दल, शहरातील दंडा बाबा मंदिर, साईबाबा मंदिर, दिनदयाल वार्ड व कारवा रोड पासून सायंककाळी 5 वाजता शोभायात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला.

बाल कलाकारांनी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या भूमिका साकारली होती. देशभक्ती वर सुध्दा भूमिका साकारली होती. युवकांनी व बालकांनी यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. शहरात ढोल, ताशाचे गजर होता. यात महिला, बँड पथक, शहनाई, सह शोभायात्रा काढण्यात आली. 

विविध झाकी काढण्यात आल्या. या झाक्या नागरिकांना आकर्षित करित होत्या. रामभक्तांना ठंड़ा जल व महाप्रसादाचे वितरण मुख्य मार्ग व कॉलरी मार्गात गांधी पुतला परिसर, गांधी चौक परिसर, सातनल चौक परिसर, कादरिया मस्जिद परिसरात चौकात, वेकोली कांटा गेट परिसरात मसाला चावल व थंड पेय व शरबत चे वितरण करण्यात आले. 

नगर परिषद चौकात भाजपा तर्फे चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ५००० थंड पाणी च्या बॉटल वितरण करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos