महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात ठेकेदारी तत्वावर काम करणारा सबस्टेशन ऑपरेटर जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगांव :
तालुक्यातील राजूर येथील सबस्टेशनवर वीज बंद करण्यासाठी गेलेल्या एका सबस्टेशन  ऑपरेटरचा  विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ७.१५ मिनिटांनी घडली. घटना लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने ही माहिती  अभियंत्यांना  दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे. 
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात ठेकेदारी तत्वावर काम करणारे सुभाष सुधाकर मत्ते (२५) रा.  सगणापूर तालुका मारेगाव हे आज सकाळी ७ वाजता दरम्यान राजूर इजारा येथे लाईन बंद करण्याकरिता गेले होते. यादरम्यान ए बी स्विचला विद्युत प्रवाह चालू असल्याने सुभाषाने हात लावताच त्याला जोरदार विजेचा धक्का लागला. 
करंट इतका जबरदस्त होता की ज्यामुळे सुभाषचा जागीच मृत्यू झाला. ही घटना  सुरक्षा रक्षक भास्कर ईश्वर ढेंगळे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित फोन करून अभियंता राकेश कराडकर व शेषराव जाधव यांना माहिती दिली. त्यांनी सुभाषचा मृतदेह  ग्रामीण रुग्णालयात आणला. घटनेचा पुढील तपास ठाणेदाराच्या मार्गदर्शनात वासुदेव नारनवरे करीत आहे. सुभाषच्या अकस्मात मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 



  Print






News - Rajy | Posted : 2018-12-18






Related Photos