जादुटोण्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास


- १ हजार रूपये दंडही ठोठावला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जादुटोण्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील प्रमुख सत्र न्यायाधिश एस.आर. शर्मा यांनी ५ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
धर्मपाल रघुनाथ कडाम असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने  आपल्या मुलाला दहा बारा वर्षांपूर्वी जादूटोणा केल्याच्या संशयावरून फिर्यादीवर कुऱ्हाडीने हल्ला केला होता. यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. देसाईगंज पोलिसांनी बयान नोंदवून आरोपीविरूध्द कलम ३०७ , ५०४ भादंवी सहकलम ३ (२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा जादुटोना प्रतिबंधक अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. आर. शर्मा यांनी साक्ष पुरावा तपासून व सहाय्यक सरकारी वकील एस.यु. कुंभारे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आज १५ डिसेंबर रोजी आरोपीस शिक्षा ठोठावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सचिन मानकर यांनी केला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम बघितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-15


Related Photos