महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा : राईस मिलच्या खोलीत आढळला पांढरा नाग


- नाग साप अत्यंत दुर्मिळ म्हणजेच अल्बिनो कोब्रा असल्याची सर्पमित्र नईम शेख यांची माहिती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा तालुका जंगलाला लागुन आहे. सिरोंचा येथील एका राईस मिलच्या खोलीत १९ मार्च २०२३ ला एक नाग दडुन बसल्याचे दिसुन आले. सदर माहिती सिरोंचा येथील सर्पमित्र नईम शेख यांना मिळाली असता त्यांनी सदर ठिकाणी गेले. त्यानंतर सर्पमित्रांनी नागाला जेव्हा बाहेर काढले तेव्हा नाग पांढऱ्या रंगाचा निघाला.

विशेष म्हणजे हा नाग दुर्मिळ असण्यासोबतच दिसायला अतिशय सुंदर आणि पांढरा शुभ्र असतो. हा साप व्हाईट एल्बिनो या नावने ओळखला जात असल्याची माहिती सर्पमित्र नईम शेख यांनी दिले. तसेच सापाची लांबी ४ फुट ९ से.मी. असल्याचे सांगितले. या प्रजातीच्या सापाची वाढ कमी असते. मात्र हा साप पुर्ण वाढलेला होता. त्वचेचा होणाऱ्या अल्बीनझम या आजारामुळे त्वचा अगदी पांढरी शुभ्र होते. पांढऱ्या त्वचेमुळे साप एल्बिनो म्हणुन ओळखला जातो. क्वचितच प्रसंगी सापामध्ये हा आजार दिसुन येतो. गडचिरोली जिल्हयात कोब्रा प्रजातीचे साप मोठया संख्येने आढळुन येत असले, तरी एल्बिनो कोब्राची ही पहिलीच नोंद आहे.

यावेळी सर्पमित्र नईम शेख व त्यांचे सहकारी यांनी सदर सापाला प्राकृतीक अधिवासात मुक्त केले.

 





  Print






News - Gadchiroli




Related Photos