महत्वाच्या बातम्या

 आदिवासी विद्यार्थी संघा व अजय कंकडालवार मित्र परिवाराकडून आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ११८ जोडपे विवाहबद्ध


- व्येंकटरावपेठा येथे ११८ जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले.

- सामूहिक विवाह सोहळ्याला हजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतील व्येंकटरावपेठा येथे आदिवासी विद्यार्थी संघ व अजय मित्र मंडळ कडून काल २० मार्च २०२३ ला व्येंकटरावपेठा येथे लक्ष्मी देवी बोनलू व ११८ जोडप्यांचा एकाच मांडवात सामूहिक लग्न सोहळा पार पडला, असून यांसाठी नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र, डोरले, वधू-वरांना नवे कपड़े, संसारोपयोगी साहित्य व वऱ्हाडीना मिष्ठान भोजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनाली अजय कंकडालवार यांच्या कडून सदर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्न सोहळ्याला येणारा संपूर्ण खर्च प्रशासनाकडुन नव्हता तर कंकडालवार परिवाराकडुन करण्यात आले. तसेच लग्न सोहळ्यात ७५% अनु. जमातीचे जोडपे होते तर उर्वरित अनु. जाती व इतर प्रवर्गतील जोडपे लग्न बंधनात अडकले आहेत.

यावेळी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सोनाली अजय कंकडालवार यांच्या सहित मंचावर आविसचे नेते नंदू मट्टामी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, रियाज शेख,अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सुरेखा आलाम, माजी उपसभापती गीता चालुरकर, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक विलास गलबले, नगरसेविका मीना ओंडरे, जोती सड़मेक, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी जि.प. सदस्या सुनीता कुसनाके, माजी पंचायत समिती सदस्या शितल दुर्गे, योगीता मोहूर्ले, छाया पोरतेट, संगीता दुर्वा ,इंदारामचे सरपंचा पेंदाम, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, रेपनपल्लीचे सरपंचा लक्ष्मी मडावी, दामरंचा सरपंचा किरण कोडापे, नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच वैभव कंकडालवार, उपसरपंच शानगोंडावार, उपसरपंच हरिष गावडे, माजी सरपंच गुलाब सोयाम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, माजी उपसरपंच अशोक येलमुले, माजी उपसरपंच जगनाथ मडावी, मीना गर्गम ग्रामपंचायत सदस्य व्येकाटरावपेठा, माजी सरपंचा सुंगधा मडावी, माजी सरपंचा सरोज दुर्गे, माजी सरपंच जे.टी. मडावी, माया कंकडालवार, युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार आदि मंचावर उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.

सदर विवाह सोहळ्याला हज़ारोंच्या संख्यांनी आदिवासी विद्यार्थी संघ व अजय मित्र परिवाराचे पद्द्धिकारी कार्यकर्ते व वऱ्हाडी उपस्थित होते.

यावेळी लग्न सोहळ्याच्या यशस्वीसाठी (नरेश) नरेंद्र गर्गम, श्रीनिवास राऊत, कार्तिक तोगम, शामराव राऊत, शंकर सिडाम, जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक, लक्ष्मण आत्राम, प्रमोद गोडसेलवार, तेजू दुर्गे, प्रमोद कोडापे, आदिनी सहकार्य केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रज्वल नागूलवार, किशोर दुर्गे, निरंजना वेलादी, शंकर सिडाम, दिलीपजी गर्गम, राजु सिडाम, शामराव राऊत, माधव राऊत, रवी कुळमेथे, महेश दहागावकर हरि राऊत, रवी सडमेक, रमेश सोयाम, वसंत गेडाम, राकेश चिंचोलकर, सुरेंद्र गर्गम, महेश कुळमेथ, साई सडमेक, बापू आलाम, अविनाश गेडाम यांनी केले. 

यावेळी गावातील समस्त नागरिकांनी सहकार्य केले व हज़ारोंच्या संख्यांने उपस्थित राहून वधू-वरांना मंगलमय शुभाशीर्वाद दिले.

सदर लग्न सोहळा दोन वर्षापुर्वी नियोजन केले होते. मात्र कोरोना संकटामुळे घेता आला नाही. दरवर्षी व्येंकटरावपेठा येथे लक्ष्मी देवी बोनलू येरमा परिवाराकडुन साजरी केली जाते. यावेळी ११ जोडपे विवाह करू द्यावी, असे परिवाराकडुन ठरले होते. मात्र ११८ जोडपे तयार झाले, असून सर्व जाती धर्मांचे जोडपे असून कसल्याही भेदभाव केले, नसून सर्वांच्या मदतीने सहकार्याने योग्य पद्धतीने विवाह सोहळा पार पडले. येणाऱ्या काळाता यापेक्षा मोठे सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येईल.





  Print






News - Gadchiroli




Related Photos