जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


-वर्षभरात २३५ दहशतवाद्यांचा खात्मा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.  सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. या वर्षात आतापर्यंत २३५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.   
परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. पण रात्री जवानांनी मोहीम थांबवली आणि आज सकाळी पुन्हा सुरू झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. काश्मीर खोऱ्यात जवानांकडून वारंवार दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली जात असून  या वर्षात आतापर्यंत २३५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या अधिक होती. 



  Print






News - World | Posted : 2018-12-13






Related Photos