रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडतो आहे असे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार आणि आरबीआय वादाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त समोर आले आहे. आरबीआयमध्ये गव्हर्नर पदावर काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती असेही उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. तसेच आपण आपल्या पदाचा त्वरित राजीनामा देत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  
आरबीआयच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करणं हा माझ्यासाठी गौरव होता. मी माझ्या सहकाऱ्यांचे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो.  त्यांनी मला खूप सहकार्य केले असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्जित पटेल यांची नियुक्ती केली होती. आता वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी पद सोडल्याचे जाहीर केले असले तरीही हा मोदी सरकारसाठी झटका मानला जातो आहे.
केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यात झालेल्या वादाची पार्श्वभूमी हे या राजीनाम्याचे मुख्य कारण मानले जाते आहे. आरबीआय आणि सरकार यांच्यात काही मुद्द्यांवर वाद सुरु होता. १९ नोव्हेंबरला एक बैठक पार पडली ज्यात आरबीआय आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी होते. या बैठकीनंतर उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातला वाद मिटला अशाही बातम्या समोर आल्या होत्या. अशात आता उर्जित पटेल यांनी पद सोडण्याचा घेतलेला निर्णय हा मोदींसाठी धक्का मानला जातो आहे. 



  Print






News - World | Posted : 2018-12-10






Related Photos