महत्वाच्या बातम्या

 कृत्रिम अंग साहित्य वितरणासाठी तालुकास्तरावर मोजमाप शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष  सहाय्य विभागाच्या वतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलिम्को या कंपनी मार्फत निशुल्क कृत्रिम अंग साहित्य देण्यात येणार आहे. यासाठी साहित्याचे वाटप करण्यापुर्वी 14 ते 21 मार्च कालावधीत तालुका स्तरावर मोजमाप तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला दिव्यांगांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर शिबिर तालुका स्तरावर घेतले जाणार असून त्यात 14 मार्च रोजी पंचायत समिती वर्धा, 15 मार्च पंचायत समिती आष्टी, 16 मार्च पंचायत समिती कारंजा, 17 मार्च पंचायत समिती हिंगणघाट, 18 मार्च रामदास तडस इनडोअर स्टेडियम देवळी, 19 मार्च आर्वी, 20 मार्च समुद्रपूर व 21 मार्च रोजी सेलू येथे शिबिर होईल.

संबंधित पंचायत समिती येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत तपासणी शिबिर होणार आहे. शिबिरामध्ये येतांना 40 टक्के दिव्यांगत्व असल्याचा वैद्यकीय दाखला, 22 हजार 500 रुपये मासिक उत्पन्न असल्याचा उत्पन्न दाखला व दोन छायाचित्र घेऊन उपस्थित राहावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos