शाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतकरी, कष्टकरी, कामगार लोकांच्या हक्क आणि अधिकारासाठी शेतीसह युवकांना रोजगार,क्रीडा व शैक्षणिक अशा शाश्वत विकासासाठी काम करणे हेच शेतकरी कामगार पक्षाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केले. 
 राजगाटा चक येथील राजे कबड्डी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दिवसरात्र कालीन खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सदस्य नेताजी गावतुरे तर प्रमुख अतिथी म्हणून शेकापच्या अर्चना चुधरी, दिनेश बोरकुटे, रोहिदास कुमरे, पं.स. सदस्या जास्वंदा गेडाम, पोलीस पाटील खिमदेवी चुधरी, वीणाताई चुधरी, मिनाक्षी जराते, खुशाल मडावी, ज्ञानेश्वर कोडाप,सुनील नक्षीने मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील कुळमेथे, कैलास लेनगुरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन भूषण गावतुरे यांनी केले. यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते चंद्रशेखर भांडेकर, योगेश गावतुरे, अमर टेकाम, विपूल गेडाम, शंकर सोनटक्के, रोशन सेडमाके, संदिप शेडमाके, टिनू गेडाम यांनी परिश्रम घेतले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-06


Related Photos