नवीन वाहन घेतल्याच्या आनंदात शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी : 
साई मंदिरा लगत व पालखी मार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री एका सेवानिवृत्त जवानाने गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुष्पराज रामप्रसाद सिंग असे या ३८ वर्षीय जवानाचे नाव आहे. मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेले पुष्पराज रामप्रसाद सिंग आपल्या काही मित्र व भावासोबत मध्यरात्री शिर्डीला आले होते.
त्यांनी पालखी रोड येथे हॉटेल कौशल्या येथे रूम बूक केली. यावेळी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. त्याने नवीन गाडी घेतली त्या आनंदात त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी औताडे यांच्या फिर्यादीनुसार पुष्कराजवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस उपाधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक खरात अधिक तपास करत आहेत. संबंधित जवानाकडे बंदुकीचा परवाना आहे.जवान पुष्कराज सिंग मद्यधुंद असल्याचेही समजते. दरम्यान, हा गोळीबार  वादातून झाला की आनंदातून? हे तपासाअंती स्पष्ट होईल.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-06


Related Photos