राममंदिर बांधकामा संदर्भात विश्व हिंदू परिषदे तर्फे खा. अशोक नेते यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
अयोध्या येथे राम मंदिर निर्माण करण्यासत्गु विलंब होत आहे . रामाचा जन्म अयोद्येत झाला हे सिद्ध होउनही न्यायालयाकडून उशीर होत आहे. तेव्हा संसदेत विधेयक आणून कायदा करावा व राम मंदिर बांधकामाला परवानगी द्यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदे तर्फे खा. अशोक नेते यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे . 
अयोध्या येथे भव्य राममंदिर निर्माण करण्यासाठी इ .स. १९५० पासून अनेक आंदोलने व न्यायपालिकेत प्रयत्न चालू आहेत  सर्वोच्च न्यायालयात गेल्या ८ वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहे . मूळ प्रकरणाची कार्यवाही टाळण्या करीत वेगवेगळ्या प्रकारची चाल ढकल करीत आहे . विनाकारण हिंदू समाजाच्या धैर्याची परीक्षा घेत आहेत . आजच्या परिस्थितीत याचे उत्तर हेच आहे कि , केंद्रीय सरकारनी विधेयक आणून आणि कायदा बनवून श्रीराम जन्मभूमीवर भव्य राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करावा . अशी मागणी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे .

निवेदन देतांना विहिप चे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष गोविंद शेंडे, जि. संघसंचालक घिसुलाल काबरा, जि. अध्यक्ष वामनराव फाये, रामायण खटी , जयप्रकाश शेंडे , विकास वडेट्टीवार , विनय मडावी , स्नेहा राणी उसेंडी , रोशन आखाडे , गुड्डू कासरलावर, एड. नीलकंठ भांडेकर , सौरभ पुण्यप्रेड्डीवार , सुरज शंकरवार, मंजू कृष्णापूरकर आदी उपस्थित होते. 
    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-03


Related Photos