पेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पेंढरी (धानोरा) :
काल १ डिसेंबर पासून नक्षल्यांचा सप्ताह सुरु आहे. सुरुवातीलाच नक्षल्यांच्या दहशत निर्माण करीत रस्ता कामावरील तब्बल १६ वाहने जाळली. तसेच जिल्ह्याच्या दुर्गम भागात बॅनर  तसेच पत्रके टाकलेली आहेत. धानोरा तालुक्यातील  पेंढरी व पुलखल येथे सुद्धा नक्षल्यांनी बॅनर लावून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. याला विरोध दर्शवत नागरिकांनी आज २ डिसेंबर रोजी पेंढरी व पुलखल मार्गावर लावलेला बॅनर काढून जाळून टाकला आहे. 
पेंढरी ते पुलखल जाणाऱ्या मार्गावर  नक्षल्यांनी  आदिवासी जनतेच्या मनामध्ये दहशत पसरवण्याच्या व रहदारी बंद करण्याच्या उद्देशाने लावलेले लाल कापडी  बॅनर काढून नक्षल सप्ताहाचा तीव्र निषेध केला आहे.  नागरिकांनी नक्षल विरोधी घोषणा देत बॅनर जाळून टाकला. जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात  आले आहे. नागरिकांनी नक्षल्यांना कसल्याही प्रकारचे सहकार्य करू नये असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-02


Related Photos