महत्वाच्या बातम्या

 तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रारी निवारण समितीवर सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी/ ट्रॅासजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असुन या घटकास समाजाकडुन सापत्न व भेद भावाची वागणुक दिली जाते. नेहमीच भेदभाव, सापत्न वागणुकी मुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासुन दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासना मार्फत मुलभुत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८ प्र.क्र. २६/सामासु ०७ ऑक्टोबर २०२० अन्वये जिल्हयातील तृतीयपंथीय यांच्या तक्रारीचे/समस्यांचे जिल्हास्तरावर तक्रार निवारण होणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. सदर जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक एक व्यक्तीची नेमणुक करावयाची आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक संबंधित व्यक्तीनी १७ मार्च २०२३ रोजी पर्यत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागचे

सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

या जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती सदस्यांची नव्याने समावेश करुन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. त्याकरीता सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी, गडचिरोली जिल्हातील संबंधीत व्यक्तीनी अर्ज करण्याकरिता, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी. ऑफिस रोड आयटीआय चौक गडचिरोली ४४२६०५ या पत्त्यावर किंवा

कार्यालयाचा संपर्क क्र. ०७१३२-२२२१९२ वर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos