महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ६ जानेवारीला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हनुमान टेकडी, वर्धा येथे करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय पास, पदवी, पदविकाधारक उमेदवारांना औद्योगिक व सेवा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यास डीएसटीए एज्युकेशन फाऊंडेशन पुणे, सुमित फॅसिलिटी प्रा.ली. पुणे, टाल टेक्नोलॉजी प्रा.लि. वर्धा, बीव्हीजी इंडिया लि. पुणे, इरोस ह्युदई प्रा.लि वर्धा, अलाईड रिसोर्स प्रा.लि. पुणे या नामांकित कंपन्या सहभागी होणार असून या मेळाव्यात अंदाने ४५८ रिक्त पदे उपलब्ध राहणार आहे.

रोजगार मेळावा शासानाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ६ ते ९ जानेवारी २३ पर्यंत उपलब्ध असणार आहे. इच्छूक उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्ड वरील नोंदणी क्रमांक व पासवर्डचा वापर करून लॉगईन करावे व पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडून जिल्हा वर्धा निवडावा व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीची निवड करून अर्ज करावे. रोजगार मेळाव्यात आपले पासपोर्ट फोटो व सर्व शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तिसरा माळा, प्रशासकीय भवन, सिव्हिल लाईन वर्धा येथे संपर्क साधावे.





  Print






News - Wardha




Related Photos