महत्वाच्या बातम्या

 सामाजिक समस्या सोडविण्याकरीता सरपंचाना प्रशासनाने सहकार्य करावे : आ.विनोद अग्रवाल


- वैयक्तिक लाभाची योजनेला प्रथम प्राधान्य देऊन नागरिकांना लाभ द्या : आ.विनोद अग्रवाल

- पंचायत समिति गोंदिया तर्फे आयोजित सरपंच सम्मेलनामध्ये आ.विनोद अग्रवाल यांचे प्रतिपादन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : पंचायत समिती गोंदिया तर्फे ग्रीनलेंड लाँन गोंदिया मध्ये सरपंच सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आ.विनोद अग्रवाल यांनी उपस्थित प्रशासनिक अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना सुचवतानी बोलले सामाजिक समस्या सोडविण्याकरीता सरपंचाना प्रशासनाने सहकार्य करावे कारण नागरिकांची मोठी अपेक्षा ग्राम पंचायत चे पदाधिकारी वर असते. त्याकरीता गावातील कोणतीही अडचणी किंवा विकासकामे असतील त्यासाठी सरपंच यांना विश्वासात घेउन कार्य करावे. जेणेकरून फार चांगल्या पद्धतीने ते कार्य करता येईल. गृहनिर्माण अभियंता, यांनी सुद्धा सरपंच यांना माहिती देऊन गावात काम करावे असे सुचवले.

आदिवासी समाजातील समाजबांधवाकरीता अप्रैल महिन्यात घरकुल मंजूर केले जाईल. तसेच ओबीसी समाजबांधवाकरीता यंदा अर्थसंकल्पीय बजट मध्ये आवास करीता योजनाची घोषणा होण्याची शक्यता आहे.तसेच नागरिकांना पाण्याची सोय करीता गोंदिया विधानसभा क्षेत्रा करीता २२८ करोड़ रूपयाची योजनेला मंजूरी मिळालेली आहे. व धापेवाडा डेम वरुन पानी ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच अनेक गावात या अगोदर शासनाच्या स्वतंत्रता पानी पुरवठा योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, भारत निर्माण योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना हे सर्व योजना पानी मिळण्याबाबत कार्य करण्यात आले आहे परंतु संबधित अधिकारी वर्ग यामुळे पाणीची सोय होत नाही आहे त्या करीता अश्या कर्मचारी अधिकारी वर कार्यवाही करण्याचे निर्देश आ.विनोद अग्रवाल यांनी दिले.

गावातील नागरिकांना व्यक्तिक लाभाची योजनेचा लाभ द्या व या करीता जे अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग पैसांची मागणी करीत असतात त्यांना एंटी करप्शन मध्ये कार्यवाही केली जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांच्या लाभाची योजनामध्ये प्रथम प्राधान्य द्या व सर्वाना योजनाबाबत अवगत करावे तसेच मनरेगा अंतर्गत मंजूरांना कामे द्या व जनहितार्थ कार्याकरीता ग्राम पंचायतीला भेट द्या असे विधान आ.विनोद अग्रवाल यांनी मांडले. तसेच आमदार स्थानिक निधीतुन ८६ ग्राम पंचायत मध्ये पुस्तके चे वाटप करण्यात येणार आहे.

या दरम्यान आ.विनोद अग्रवाल, पूजा अखिलेश सेठ सभापती समाज कल्याण, सभापती मुनेश रहांगडाले, उपसभापती नीरज उपवंशी, खंड विकास अधिकारी मुड़े साहेब, तुमडाम साहेब कृषि अधिकारी, जिप सदस्या अश्विनी पटले, जिप सदस्य अनंदा वाढीवा, जिप सदस्या शांता देशभ्रतार, जि. प.  सदस्य रितेश मलगाम, वंदना पटले पस सदस्या, शिवलाल जमरे पस सदस्य, शशि राजू कटरे, पस सदस्या, विद्यकला पटले, पस सदस्य, नंदिनी लिल्हारे पस सदस्या, अजाबराव रिनायत पस सदस्य, मीनाक्षी बारर्लिंगे पस,सदस्य, जितेश्वरी रहांगडाले पस सदस्य, सरला लिकेश चीखलोंढे, सोनुला संतोष बरेले, पस सदस्या, इत्यादि अधिकारी कर्मचारी व सरपंच या दरम्यान उपस्थित होते.  





  Print






News - Gondia




Related Photos